मी निवडणुकीला उभे राहू नये म्हणून भाजपने ही खेळी केली, मात्र मला निवडणुकीला उभे राहण्याची गरज नाही. भाजपचा खरा चेहरा रामदुर्ग येथील घटनेनंतर उघड झाला आहे. देश विरोधी पोस्ट टाकणारा माणूस मुस्लिम नव्हता तर त्याच्या नावाने खोटी पोस्ट बनवून बदनामीचा कट रचण्यात आला होता .असले कुटिल कारस्थान करणे भाजपने बंद करावे .असा आरोप रामदुर्ग चे माजी आमदार अशोक पट्टण यांनी केला .
बेळगाव उत्तर चे माजी आमदार फिरोज सेठ आणि अशोक पट्टण या दोघांनी मंगळवारी बेळगाव मध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी नागराज माळी या व्यक्तीने मोहम्मदशफी बेनी याच्या नावाने केलेले कारस्थान उघड झाले आहे. असले घाणेरडे राजकारण व्हायला नको होते. रामदुर्ग मध्ये जातीय दंगली माजवण्याचा हा कट होता. त्यामुळे चुकीचे कारस्थान झाले असा आरोप त्यांनी केला.
जिल्हा पोलीस प्रमुख आणि पोलीस दलाने मात्र या प्रकरणाचा छडा लावून चांगले काम केले आहे. सामाजिक शांतता अबाधित राखण्यात मदत झाली असून नागराज माळी सारख्या गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तान विरोधी पोस्ट टाकली की मुस्लिमांना बदनाम करायचे असा कट वारंवार झाला आहे, खासदार सुरेश अंगडी आणि विद्यमान आमदार महादेवाप्पा यादवाड यांनी या कटाचे राजकारण खेळण्याचा प्रयत्न केला मात्र ते अपयशी झाले आहेत. यासंदर्भात अंगडी विरुद्ध मी कोणतीही तक्रार करणार नाही मात्र महादेवाप्पा यादवाड विरोधात तक्रार करणार असल्याचे अशोक पट्टण यांनी सांगितले.
नागराज माळी हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचे समजत असून त्याबद्दल तपास सुरू आहे. त्यामुळे ते उघड झाले की नक्की काय हे लोकांना ओळखता येणार आहे असेही अशोक पट्टण म्हणाले. मी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही असेही अशोक पट्टण यांनी सांगितले ,मात्र फिरोज शेठ यांनी अशोक पट्टण हे लोकसभा निवडणूक लढवण्यास योग्य उमेदवार असून त्यांचा विचार पक्ष करेल असे वक्तव्य केले.