बेळगाव शहरातील हनुमान नगर येथील पी के कॉटर्स येथील एक निवासी अपार्टमेंट चे सांडपाणी खुलेआम रस्त्यावर सोडण्यात येत आहे. या दूषित पाण्याने दुर्गंधी पसरत आहेच तसेच हे पाणी पिऊन जनावरांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे.
या बेकायदेशीरपणे पाणी सोडण्याला प्रशासनाचे दुर्लक्ष कारणीभूत असून त्यामुळेच हा धोका निर्माण झाला आहे. परिसरात फिरणारी मोकाट व पाळीव जनावरे हे पाणी पीत असून त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाल्यास जबाबदार कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे.
या भागात योग्य ड्रेनेज व्यवस्था देण्याकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. बेळगाव उत्तर च्या आमदारांनीही याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.
बेळगाव शहराला जे राजकारणी दुसरी राजधानी म्हणतात त्या राजधानीतील चकाचक आणि पॉश लोकॅलीटी मधील ही अवस्था बघितली की त्याच राजकारण्यांच्या दुर्लक्षित कारभाराची कल्पना येते.