काँग्रेस पक्षातील स्थानिक कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. बेळगाव लोकसभा मतदारसंघात पक्षाने उमेदवारी देताना तरुण आणि होतकरू कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी होत आहे एकीकडे उमेदवारी निश्चितीची प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे तरुण काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले असून यामध्ये जिल्हा पंचायत सदस्य मोहन मोरे यांचे नाव पुढे येत आहे.
पश्चिम भागातील बेळगुंदी ,बोकमुर या भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्वाशी अशी चर्चा करून ही मागणी केली आहे .या पश्चिम भागात काँग्रेस रुजवण्यात मोहन मोरे यांनी वाटा उचलला आहे. त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळावी अशी या कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. पिंटू पाटील प्रमोद सुतार, देवाप्पा पाटील, मल्लाप्पा पाटील ,बाबू पाटील किरण ,नारायण मोटार संजय देसाई, विठ्ठल देसाई, किसन गिराळकर अशी या कार्यकर्त्यांची नावे असून त्यानी अनेक वरिष्ठांशी याबद्दल चर्चा केली.
बेळगाव तालुक्याचा पश्चिम भाग हा महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो .या भागात जिल्हा पंचायतीची उमेदवारी घेऊन निवडून येणे ही साधी गोष्ट नव्हती, काँग्रेसचे आमदार निवडून येण्याच्या दृष्टीने हे काम चांगले झाले आहे. आणि आता आमदार पदावर असलेल्या व्यक्ती पुन्हा लोकसभेची उमेदवारी मागत आहेत .लोकसभेची उमेदवारी देताना एखाद्या पदावर असलेल्या व्यक्तींना देऊ नये आमदार पदासारखे मोठे पद असणाऱ्या व्यक्तींना खासदारकीची उमेदवारी देऊ नये त्यापेक्षा मोहन मोरे यांच्या सारख्या कार्यकर्त्याचा विचार करावा अशी मागणी जोरात आहे. इतर भागातील टप्प्याटप्प्याने कार्यकर्ते वरिष्ठांना भेटत आहेत. मात्र लोकसभेसाठी उमेदवार निवडीची प्रक्रिया सध्या पूर्ण होत आली असल्यामुळे पक्षाचे नेते यावर काय निर्णय घेतात हे स्पष्ट नाही .
अनेकांनी होतकरू तरुणांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली असल्यामुळे उमेदवारीच्या रिंगणात असणाऱ्या व्यक्तींमध्ये स्पर्धा वाढत आहे. आमदारकीच्या पदावरील व्यक्तींना उमेदवारी देण्यात येऊ नये अशी मागणी झाल्यामुळे सध्या आमदार असतानाही खासदारकीचे स्वप्न बघणाऱ्यानाही समस्या निर्माण होतात अशा व्यक्तीने त्या कार्यकर्त्यांना आज विश्वासात घेतले नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच उमेदवारीचे प्रयत्न करायला हवे असतात. मात्र तसे न झाल्यामुळे अनेक होतकरू तरुण कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी तरुण कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे सध्या बेळगाव तालुक्यात चर्चा आहे.