महाराष्ट्र एकीकरण समिती कुणाला जिंकवण्यासाठी किंवा कुणाला हरवण्यासाठी निवडणूक लढवत नसून सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या खटल्यातील न्यायाधीश केंद्र सरकारला जाग आणून देण्यासाठी 101 उमेदवार देऊन निवडणूक लढवत आहेत असे मत मध्यवर्ती समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी मांडले. लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर रंगुबाई पॅलेस मध्ये शहर समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी होते.
आपल्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या समितीला कुणीही राष्ट्रीययता किंवा देशभक्ती शिकवू नये असा टोला देखील त्यांनी राष्ट्र भक्तीचे डोस पाजवणाऱ्यांना दिला.1962,1971 च्या युद्धात दुष्काळी परिस्थितीत महाराष्ट्र एकीकरण समितीने देशासाठी आपला प्रश्न काही काळ मागे ठेवला होता असे खुद्द माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कबूल केलं होतं.संसदेत तसं भाषण देखील त्यांनी केलं होतं असे ते म्हणाले.
1996 च्या काळात ज्यावेळी समितीने अधिकाधिक भार उचलला होता त्यावेळी शहरातून 150 हुन अधिक अर्ज गेले होते यावेळी देखील शहराचे योगदान अधिक असले पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी राबावे असे आवाहन त्यांनी केलं.
आता उमेदवारी भरेल तो पालिकेच्या निवडणुकीत समितीकडून उमेदवारी मागण्यास पात्र राहील अशी अट मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी यांनी सांगितली तत्पूर्वी प्रकाश मरगाळे यांनी आगामी महापालिका निवडणूकीसाठी असलेल्या इच्छुकांनी लढवावी अन्यथा दुसऱ्याला स्व खर्चाने तयार करावे अशी भूमिका मांडली होती.यावेळी शिवराज पाटील,मदन बामणे,गणेश दद्दीकर,आदींनी आपले विचार मांडले. सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी सूत्रसंचालन केले.
जे कोणी महानगर पालिकेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत त्या सर्वानी खासदारकी उमेदवारी अर्ज भरावा आणि तेच पुढील काळात समितीचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार असतील असा ठराव देखील करण्यात आला.
उमेदवारी अर्ज घेण्यासाठी डी सी ऑफिस मध्ये जमणार
लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज घेण्यासाठी आणि मराठीतून ते अर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यासाठी शनिवारी सकाळी डी सी ऑफिस मध्ये जमा व्हा असे आवाहन मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केलं आहे.उद्या सकाळी जास्तीत जास्त अर्ज डी सी ऑफिस मधून घ्यावेत ज्यामुळे जिल्हा प्रशासन निवडणूक अधिकाऱ्यांना याची कल्पना येईल असे ते म्हणाले.