ज्या ठिकाणी (मग तो वापर शाळा कॉजेल मधला असो, कारखान्यातील असो अथवा हॉटेलमधील असो) भरपूर लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते त्याठिकाणी पाण्याच्या ग्लासचा आकार छोटा ठेवला तर बरेच पाणी वाचू शकेल कारण अशा ठिकाणी अर्धाच ग्लास पाणी वापरून बाकीचे पाणी सहसा फेकून दिले जाते.
पाणी दुर्मिळ वस्तू बनत चालली आहे.
पावसाचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे आणि पाण्याचा वापर वाढत चालला आहे म्हणून प्रत्येकाने पाणी जपून वापरावे असा सल्ला जायंट्स मेनचे अध्यक्ष सुनिल भोसले यांनी दिला.
जागतिक जलदिनानिमित्त शहरातील प्रत्येक हॉटेलमध्ये पाणी वाचवा चा संदेश देणारी भित्तीपत्रके लावण्याचा शुभारंभ आज एसपीएम रोड वरील हॉटेल रेणुका येथे पार पडला यावेळी एसपीएम रोड गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष परशराम शहापुरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी परशराम शहापुरकर यांनी जायंट्सच्या कार्याचे कौतुक करून पाण्याची बचत ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
शहरातील विविध हॉटेल्समध्ये, सार्वजनिक ठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाक्या आणि सार्वजनिक पाणपोई च्या ठिकाणी पाणी बचतीची भित्तीपत्रके लावण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेक्रेटरी प्रदीप चव्हाण,उपाध्यक्ष सुनिल मुतगेकर,खजिनदार लक्ष्मण शिंदे, मोहन कारेकर, मदन बामणे,अशोक हलगेकर, विजय बनसुर, विलास कंग्राळकर, अरुण काळे, यल्लाप्पा पाटील,अजित कोकणे,सुनिल चौगुले,भरत गावडे, अनंत हावळ, धिराना मरळीहळळी,कंग्राळकर, मुकुंद महागावकर, दिलीप सोहणी यांनी परिश्रम घेतले.सकाळपासून जायंट्स चे सदस्य शहराच्या वेगवेगळ्या भागात 350 हुन अधिक जाऊन स्टीकर लावत आहेत