Tuesday, December 24, 2024

/

काँग्रेस देणार कत्तीना तिकीट?

 belgaum

बेळगावातून लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाकडून प्रकाश हुक्केरी यांना तिकीट दिले जाणार आहे. भाजपने आण्णासाहेब जोल्ले यांना तिकीट दिल्यानंतर नाराज झालेल्या भाजपच्या रमेश कत्तींना काँग्रेसने तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भातील वाटाघाटी जोरदार सुरू असून लवकरात लवकर रमेश कत्ती चिकोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार म्हणून जाहीर केले जाणार आहे .
यासाठी रमेश कत्ती त्यांना बेंगळुरात बोलावण्यात आले असल्याची माहिती उघड होत असून भाजपला रामराम ठोकून काँग्रेसचे तिकीट मिळवण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. यापूर्वी चिकोडी मतदारसंघातून विद्यमान खासदार प्रकाश हुक्केरी यांना तिकीट देण्यात आले होते. मात्र काँग्रेसने त्यांना आता चिकोडी मध्ये सी फॉर्म देऊन बेळगाव साठी बी फॉर्म देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार व्ही एस साधूंनावर अडचणीत आले आहेत.

Hukkeri katti

चिकोडी चे राजकारण उत्तर कर्नाटकाला भारी पडणार आहे.

चिकोडी लोकसभा मतदारसंघात भाजपने तिकीट देताना कत्ती बंधूना फाटा देऊन अण्णासाहेब जोल्ले यांचे नाव पुढे काढल्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेसने प्रकाश हुक्केरी यांना उमेदवारी दिलेली असताना त्यांच्या विरोधात भाजपने अण्णासाहेब जोल्लेंचे कार्ड पुढे केले आहे .मात्र यामुळे कत्ती बंधू नाराज झाले असून ते काय करतात याच्यावर बेळगाव जिल्हा आणि पर्यायाने उत्तर कर्नाटकातील राजकारण ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात आहे.

उमेश कत्ती यांचे बंधू असलेले तसेच आमदार असलेले रमेश कत्ती यांचे नाव चिकोडी लोकसभा मतदारसंघासाठी जाहीर करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. भाजपने त्या पद्धतीने काम सुरू केले होते. स्वतः माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रमुख बी एस एडीयुरप्पा यांनी हिरवा कंदील दिला होता. मात्र ऐनवेळी निपाणीच्या आमदार शशिकलाताई जोल्ले यांचे पती उद्योजक अण्णासाहेब जोल्ले यांना तिकीट देण्यात आले. त्यामुळे आता कत्ती बंधूंची पुढची भूमिका काय याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.हीच संधी साधण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.
काँग्रेसने विद्यमान खासदार प्रकाश हुक्केरी यांना तिकीट देऊन अण्णासाहेब जोल्ले विरुद्ध हुक्केरी अशी चांगलीच टक्कर या मतदारसंघात लावली आहे. पण हुक्केरी ऐवजी भाजपच्या कत्ती ना आयात केले तर फायदा होईल हा विचार पुढे आल्यावर राजकीय समीकरणे बदलत आहेत. कत्ती बंधू भाजपवर नाराज झाले आहेत. याचा फायदा आता काँग्रेस घेईल.

1 COMMENT

  1. If Katti brothers joind Congress then it’s very difficult to BJP. At last Belgaum & Chikkodi MP seats comes under danger position.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.