Wednesday, December 25, 2024

/

दक्षिण मतदार संघात संघटना मजबूत करू: जारकीहोळी

 belgaum

बेळगाव दक्षिण मतदार संघात लवकरच वार्ड निहाय सभा बैठक करू या भागात काँग्रेस कार्यकर्त्यांची संख्या अधिक आहे लवकरच दक्षिण मतदार संघात देखील काँग्रेस बळकट करू असे मत वन मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.
मंगळवारी वडगांव येथील जिव्हेश्वर मंगल कार्यालयात आयोजित दक्षिण मतदार संघाच्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करत होते.ज्या मतदारसंघात मागील लोकसभेत काँग्रेसला सर्वात कमी मते मिळाली या मतदार संघातून वडगाव मधून काँग्रेसचे लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे.

Congress campeign

लोकसभेच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांनी अधिकाधिक संख्येने बाहेर येऊन प्रचारात आघाडी घ्यावी सर्वांना विश्वासात घेऊन लोकसभेचा उमेदवार ठरवला जाईल असेही ते म्हणाले.

केंद्रातील भाजप सरकारने पाच वर्षात केलेला अन्याय काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेच्या समोर ठेवावा पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद झाले या घटनेस गुप्तचर विभाग अपयश बऱ्यापैकी जबाबदार आहे.काँग्रेसने 60 वर्षात अनेक युद्ध जिंकली मात्र याचं कधीच राजकारण केलं नाही असे माजी आमदार फिरोज सेठ म्हणाले.यावेळी जिल्हा महानगर काँग्रेस अध्यक्ष राजू सेठ,विनय नावलगट्टी, वीरकुमार पाटील ,रमेश गोरल,सुनील हंणमन्नावर,जयराज हलगेकर,परशुराम ढगे, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.