पुणे बंगळूर महामार्गावर सकाळी झालेल्या एक दुर्दैवी अपघातात भाऊ आणि त्याची विवाहित बहीण मृत्युमुखी पडले आहेत. सकाळी 11 वाजता हरगापूरगड च्या पायथ्याशी शिंदेवाडी फाटा आहे, त्या हरगापूरगड वरून शिप्पूरकडे भाऊ बहीण मोटारसायकल वरून चालले असता हा अपघात घडला.
ते दोघे चालले होते. बहिणीला बरे नव्हते म्हणून दवाखान्याला दाखवून तिच्या सासरी सोडण्यास तो भाऊ निघाला होता.
पाठीमागून बेळगावहून कोल्हापूरकडे एक स्विफ्ट कार येत होती. त्या कारने त्या मोटारसायकलीला जोरदार धडक देऊन तब्बल 200 फूट फरफटत नेले आणि रस्त्याच्या शेजारी एक नादुरुस्त ट्रक थांबला होता त्याला नेऊन स्विफ्ट आदळवली यामुळे स्विफ्ट आणि ट्रक च्या मध्ये मोटारसायकल चिरडून दोघे भाऊ बहीण ठार झाले.
स्विफ्ट मधील पती पत्नी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले आहे.
मयत भाऊ बहीण हे हरगापूर येथील आहेत.भैरू आप्पाण्णा शिंदे (वय 30) असे त्या दुर्दैवी भावाचे नाव आहे. अनिता बाळकृष्ण खराडे( वय 35) ही त्याची बहीण सुद्धा मयत झाली आहे. तब्येत बरी नाही म्हणून ती माहेरला गेली होती, तिला परत सोडून येण्यास तो जात होता.
संकेश्वर पोलीस स्थानकात घटनेची एफ आय आर झाली आहे.