भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा देणाऱ्या भगतसिंह सुखदेव व राजगुरु यांना २३ मार्च १९३१ रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली होती.
त्या घटनेला आज ८८ वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त आज भगतसिंग चौक पाटील गल्ली शनिमंदिर येथे ह्या भारत मातेच्या वीर सूपूत्राना भगतसिंग युवक मंडळ पाटील गल्ली तर्फे अभिवादन करण्यात आले.
भगत सिंह राजगुरू सुखदेव यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा पाया रचला त्यामुळे पुढे स्वातंत्र्य चळवळ खऱ्या अर्थाने सुरू झाली मग ब्रिटिशांनी देशाला स्वातंत्र्य बहाल केले असे मत समिती नेते प्रकाश मरगाळे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम ला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगांव शहराचे माजी महापौर मालोजीराव अष्टेकर तुकाराम बँक चे चेअरमन प्रकाश मरगाळे, पंडित कदम,गजानन पाटील,तात्या पाटील,दत्ता गोडसे प्रमोद पाटील सतीश सावंत मंगेश कोंगलेकर अनंत मळीक अमन खांडोळकर विजय होनगेकर व परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.