लोकसभा निवडणुकीच्या अर्ज भरणा यंत्रणेला आज पासून सुरुवात होणार आहे. 4 एप्रिल पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. बेळगावचे निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळ्ळी हे काम बघणार आहेत. डीसी ऑफिस मधील कोर्ट हॉल मध्ये अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
बेळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण 17 लाख 49 हजार मतदार असून 8 लाख 79 हजार 619 पुरुष व 8 लाख 69 हजार 333 महिला आहेत.
तरुण मतदारांची संख्या 27400 इतकी आहे.
बेळगाव लोकसभा मतदार संघात शहरी भागात 748 आणि ग्रामीण भागात 1316 मतदान केंद्रात 23 एप्रिल रोजी मतदान होईल.