केंद्रीय भाजपच्या निवडणूक कोअर कमिटीने होळीच्या निमित्ताने सायंकाळी देशातील 182 सीट वरील उमेदवाऱ्या जाहीर केल्या आहेत.केंद्रीय निवडणूक समितीचे सचिव जे पी नड्डा यांनी उमेदवारांची सूची जाहीर केली असून बेळगाव ची उमेदवारी जाहीर झाली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागांवरील सीट कुणाला मिळते याचे लक्ष लागून राहिले होते बेळगावातुन सुरेश अंगडी यांना चौथ्यांदा तिकीट मिळाले आहे. चिकोडीचे तिकीट अध्याप जाहीर झाले नाही. माजी खासदार रमेश कत्ती आणि अण्णासाहेब जोल्ले यांच्यात तिकिटासाठी चुरस सुरू असल्याने चिकोडी उमेदवारी अजून जाहीर झाली नाही.
कर्नाटकातील 28 पैकी 27 तिकीट जाहीर झाली असून केवळ चिकोडी तिकीट जाहीर झाले नाही. भाजप माजी खासदार रमेश कती आणि अण्णासाहेब जोल्ले यांच्यात भाजपच्या वेगवेगळ्या नेत्यां कडून लॉबिंग सुरू आहे.