Thursday, December 5, 2024

/

अबकी बार 101 उमेदवार.. श्रेय बेळगाव live चे…

 belgaum

राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार बेळगाव लोकसभा मतदारसंघात मराठी निर्णायक मतांवर निवडून येतात. पण मराठी माणसाच्या महाराष्ट्रात सहभागी होण्याच्या मागणीशी सहमत राहात नाहीत. यासाठी त्यांना मतदान करण्यापेक्षा मराठी मतांची ताकद दाखवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक झाली. यावेळी 101 सीमावासीयांनी उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे श्रेय बेळगाव live चे आहे. बेळगाव live ने असे होण्याची शक्यता आहे असा अंदाज वर्तवला होता. हा अंदाज खरा ठरला आहे.

1996 च्या लोकसभा निवडणुकीत अशीच घटना घडली होती, यामुळे एक महिना बेळगावची निवडणूक पुढे ढकलावी लागली होती. यावेळी पुन्हा अशी पुनरावृत्ती होणार आहे.असा अंदाज बेळगाव live ने वर्तवला होता.
समितीचे 101 उमेदवार यावेळी उमेदवारी भरणार आहेत. यापुढील काळात येणारी महानगरपालिका, तालुका पंचायत, ग्राम पंचायत, जिल्हा पंचायत व आमदारकीच्या निवडणुकीत समितीकडे उमेदवारी मागण्यास इच्छुक असणाऱ्यांनी या निवडणुकीत आपल्या आपल्या भागात आपल्या मागे किती मतदार आहेत हे दाखवून देण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत अर्ज भरून आपला प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे मराठी माणूस आणि बेळगाव live चे यश आहे.

1996 मध्ये बेळगाव मतदारसंघात एकूण 456 उमेदवार रिंगणात होते. यापैकी 452 उमेदवार अपक्ष म्हणजेच समिती प्रणित होते. निवडणूक घेणे अवघड झाल्यामुळे अखेर निवडणूक आयोगाला ही निवडणूक एक महिना पुढे ढकलावी लागली होती. जनता दलाचे शिवानंद कौजलगी त्यावेळी निवडून आले होते.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या जास्तीत जास्त उमेदवार देण्याच्या धोरणाने ही परिस्थिती निर्माण केली होती.
1956 पासून जो सीमाप्रश्नी लढा सुरू आहे त्या प्रश्नाकडे लक्ष्य वेधून घेण्यासाठी समिती नेत्यांनी हे धोरण ठरवले होते.तब्बल 400 समिती कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी होऊन उमेदवार झाल्याने निवडणूक आयोगाचीही भंबेरी उडाली होती.याचीच पुनरावृत्ती होईल असा बेळगाव live चा अंदाज होता. तो वरील 101 घोषणे ने खरा ठरणार आहे.

निवडणुकीची आचार संहिता जाहीर होताच 11 मार्च रोजी बेळगाव live ने ‘समिती1996 ची पुनरावृत्ती करील का?या मथळ्याखाली सर्वप्रथम बातमी प्रसिद्ध केली होती त्या बातमीचे लिंक खाली आहे

एकीकरण समिती 1996 ची पुनरावृत्ती करील का?

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.