आज सोमवारी बेळगाव शहराचे कमाल तापमान 34 अंशावर पोचले आहे. मागील दोन दिवसातील तापमानापेक्षा दोन अंशांनी वाढ झाली असून शहरातील नागरिक उकाड्याने हैराण होत आहेत. उन्हाळयांनी होणाऱ्या आजारांची साथ सुद्धा शहरातील नागरिक आणि बालकांमध्ये पसरली आहे.
आज शहरात उन्हाचे प्रमाण अधिक होते. उन्हाच्या झळा लागत होत्या. यामुळे उकाड्याचा त्रास जास्त होत होता.
गेले काही दिवस रात्री आणि पहाटे थंडी आणि दिवसभर उकाडा असे वातावरण होते. पण आता रात्री सुद्धा उकाडा वाढत आहे यामुळे दिवसा आणि रात्री दोन्हीवेळा उकाड्याचा अनुभव नागरिकांना घ्यावा लागत आहेत.
साथीचे आजार सध्या जास्त प्रमाणात होत आहेत. लहान मुलांना वाऱ्या फोड्या, गोवर असे आजार होत आहेत. सर्दी, खोकला, ताप असे आजार वाढत असून ते आजार उन्हाळी काळात जास्त त्रासदायक ठरत आहेत.