रिंग रोड जमीन संपादनात सर्व्हे करायला आलेल्या अधिकाऱ्यांची उपकरणे जप्त केल्याची घटना मुतगा येथे घडली आहे.रविवारी दुपारी या महिन्यात दुसऱ्यांदा सर्व्हे कंत्राटदार दुसऱ्यांदा सर्व्हे साठी आले होते.
रिंगरोडला शेतकऱ्यांनी जोरात विरोध चालू असताना पुन्हा मुतगा परिसरात सर्व्हेक्षण करण्यास आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी रोखले तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर, नारायण कणबरकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
प्रांताधिकारी कविता योगप्पांनावर आल्या शिवाय हटणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता प्रांत अधिकारी शेतात आल्या नाहीत त्यामुळं संतप्त शेतकऱ्यांनी सर्व्हे अधिकाऱ्यांची साधने मुतगा पंचायतीत ठेवली आहेत. दरम्यान सोमवारी सकाळी पोलीस आणि प्रांत आल्यावर याबाबत चर्चा होणार आहे.शेतकऱ्यांच्या हरकतीना क्लियरी फिकेशन द्यायच्या अगोदर प्रांत अधिकाऱ्यांनी सर्व्हे केलाय असा आरोप शेतकरी करत आहेत.
शेतकरी आक्रमक झाल्यामुळे आता प्रशासनाची गोची झाली आहे. रिंगरोड होऊ देणार नाही या मुद्द्यावर शेतकरी ठाम आहेत.सर्व्हे करणाऱ्यांची सर्व साधने जप्त करून पंचायतीत ठेवण्यात आली असून उद्या प्रांताधिकारी आल्यावर निर्णय घेऊ असा इशारा देण्यात आला आहे.