काही प्रसार माध्यमे नकाे त्या व्यक्तींना प्रसिद्धी देत आहेत अश्या व्यक्तींना प्रसिद्धी देण्याचे बंद झाले पाहिजे जर त्या व्यक्तींना प्रसिद्धी देण्याचे बंदं झाले नाही तर समाज बिघडणार नाही असे मत अहमदनगर येथील साहित्यिक लहू कानडे यांनी व्यक्त केले.
बेळगाव येथील येळ्ळूर येथील 14 व्या मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षस्थाना वरून बोलत होते. माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळळी यांनी या संमेलनाचे उदघाटन केलं.सकाळी महाराष्ट्र हायस्कूल जवळून ग्रंथ दिंडी काढण्यात आली.
विचार करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्यांना, अभिव्यक्ती स्वातंत्र्याला सुरुंग लावला जाणे हे भयावह आहे. अशा काळात साहित्य चळवळ नियमित सुरु ठेवणे ही गरज बनली आहे, असे परखड मत त्यांनी मांडले.साहित्य म्हणजे कलावंतांनी स्वताशी केलेला संवाद असताे. जीवनात केलेला संघर्ष साहित्यातून उमटताे. आजची परिस्थिती पाहिल्यास आपल्याच पायावर दगड टाकून घेण्याचा प्रकार हाेताे आहे. इतरांनी तयार केलेल्या मागावर नव्हे तर स्वतःचा राजमार्ग तयार करून त्यावर चालावे. सर्वप्रकराची विषमता आज देशात दिसून येत आहे. ती नष्ठ झाली पाहिजे. त्याशिवाय देशाची प्रगती हाेणार नाही. जातीच्या पुढाऱ्यांना आज किंमत आहे. जातीय राजकारनाला प्राप्त झालेले महत्व विनाशाकडे नेणारे आहे. अशा राजकारणामुळे लाेक विनाकारण अाक्रमक हाेत आहेत.
साहित्यातून येळ्ळूरात वैचारिक लढा-मुक्ता दाभोळकर
आपल्या भाषेबद्दलचे प्रेम आणि हक्कासाठी शासनाकडे प्रत्येकाने मागणी केली पाहिजे. बहूभाषिक हे वरदान आहे व त्या भाषा बाेलल्या पाहिजेत येळ्ळूरमध्ये वैचारिक एल्गार छेडला जात आहे असे प्रत्येक खेड्यातून छेडले जाणे गरजेचे आहे असे मत मुक्ता दाभोळकर यांनी व्यक्त केले.
त्या म्हणाल्या की संमेलन हे साहित्य आणि साहित्याच्या अजूबाजूला असलेल्या अंगाचा वेध घेणारे संमेलन आहे. येळ्ळूर येथील मुले बहूभाषिक आहेत हा अभिमान आहे. प्रत्येकाने बहूभाषिक झाले पाहिजे.
अंनिसच्या शाखा ३५० आहेत. प्रत्येक जिल्ह्यात शाखा आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा येथे पुरेसा वापर हाेताे की, नाही ही शंका आहे. महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीशी बेळगावकरांची नाळ आहे. सीमाभागातील अंनिस कार्यरत आहे असेही त्या म्हणाल्या.