बेळगाव तालुका म ए समितीच्या नेतृत्वाखाली येळ्ळूर विभाग म ए समितीने आज प्रांताधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची भेट घेऊन निवेदन दिले. रिंगरोडला विरोध कायम असे या निवेदनाद्वारे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
या रिंगरोडने तालुक्यातील 29 गावातील 1200 एकर जमीन धोक्यात आणली आहे. येळ्ळूर गाव हद्दीतील 15 सर्व्हे क्रमांकाच्या जमिनी घेण्यात आल्या आहेत.
पण या जमिनी सुपीक असल्याने आपला विरोध आहे असे निवेदन देण्यात आले आहे.
एल आय पाटील, विलास नारायण घाडी, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, दत्ता उघाडे, दूदाप्पा बागेवाडी, परशराम येळ्ळूरकर, चांगदेव तुळजाई यांच्यासह असंख्य शेतकऱ्यांचा समावेश होता.