मराठी भाषा संरक्षण करतो म्हणून आणि गौरव दिन करून काही होत नाहीमराठी हे चरितार्थ चालवण्यासाठी उपायुक्त ठरत नसेल तर माणूस दुसऱ्या भाषेकडे वळण्याचा धोका आहे.यासाठी भाषा ही चरितार्थाचे साधन होण्याची गरज आहे असे मत महाराष्ट्र शासनाचे कार्यासनअधिकारी गिरीश पतके यांनी व्यक्त केले.
बेळगावात वि गो साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीनं आयोजित मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी जयंत नार्वेकर सुभाष ओउळकर उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले भाषेसाठी काम करताना पूढील अनेक गोष्टींचा विचार करून काम होण्याची गरज आहे यापूर्वी अनेक भाषा नष्ट झाल्या आणि अनेक भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
आपण ज्यावेळी एकाद्या भाषेसाठी काम करतो तेंव्हा योग्य नियोजित काम करण्याची गरज असून फक्तच सरकारची ही जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकांची ही जबाबदारी आहे याबद्दल गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.कुठलेही क्षेत्र असुदेत जर आपल्याला मराठीला स्थान द्यायचे असेल तर आपण स्वतः मराठीचा वापर केला पाहिजे असेही ते म्हणाले.
मराठी पाऊल पडते पुढे आणि क्रांतीचा गर्जा जय जय कार या गीतांनी सुरुवात झाली. मालोजीराव अष्टेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.प्रबोधिनीचा उद्देश सांगितला. जयंत नार्वेकर यांनी स्वागत केलं. कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
डॉ वृषाली कदम, शैलजा मत्तीकोप व लता नगरे यांनी मराठी भाषेच्या केलेल्या सेवेबद्दल सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रसाद सावन्त यांनी केले. सुभाष ओउळकर यांनी आभार मानले.