पाईपलाईन रोड गणेशपुर येथे दोघा जणांना जबर मारहाण झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली आहे.दोन्ही जखमींना उपचारांसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या मारहाणीचा मूळ उद्देश आणि कारण समजू शकलेले नाही. बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीशी संबंधीत एक व्यक्तीच्या मुलाने ही मारहाण केल्याचा आरोप होत आहे.
जखमींवर उपचार सुरू आहेत . पोलिसांनी तपास सुरू केला आहे. फिर्याद दाखल झाल्यावरच मारहाण कुणी व का केली हे बाहेर पडणार आहे.