काँग्रेसचे बेळगावचे तालुका पंचायत अध्यक्षाना यांना जे एम एफ सी न्यायालयाने दंड ठोठावला आहे.तालुका पंचायत अध्यक्ष शंकरगौडा पाटील यांनी चेक बाऊन्स केला आहे त्या प्रकरणी कोर्टाने त्यांना दंड अथवा चार महिन्याचा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
या बाबत समजलेल्या अधिक माहिती नुसार त्यांनी मोदगा येथील व्यक्ती कडून उसने पैसे घेतले होते
त्या व्यक्तीने कायम तगादा लावल्याने चेक दिला होता तो 80 हजार चा तो चेक वटला नाही जे एम एफ सी सातव्या कोर्टात तक्रार दाराने धाव घेतल्यानंतर 80 हजार रुपये व 10 हजार रुपये दंड व हे न दिल्यास चार महिन्यांचा कारावास अशी शिक्षा न्यायालयाने दिली आहे. मंगळवारी हा निकाल सुनावण्यात आला आहे.
शंकर गौडा पाटील हे पूर्व भागातील असून विध्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे खंदे समर्थक मानले जातात या चेक बऊन्स केस मुळे पाटील यांच बरोबर काँग्रेस पक्षावर देखील प्रश्न उपस्थित होताहेत.