रविवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी तरंग अकादमीचा वार्षिकोत्सव आय एम ई आर सभागृहात दोन सत्रात संपन्न झाला. कार्यक्रमात अकादमीच्या दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करून लोकांची वाहवा मिळवली.
पहिल्या सत्राची सुरुवात पंचतुंड नररुंड या नांदीने झाली. तरंग अकादमीच्या वेगवेगळ्या शाखांच्या विद्यार्थ्यांचे तबल्यावर तीन ताल वादन झाले, राग भूपाली ने श्रोत्यांना वेगळाच आनंद दिला, अकादमीच्या नृत्य शिक्षिका कुमारी मधुरा यांचे या सत्रात नृत्य सादरीकरण झाले तसेच गिटार शिक्षक श्री प्रवीण रेवणकर, वायलिन शिक्षक श्री विनोद व कराओके शिक्षक श्री भूषण पत्तार यांचेही सादरीकरण झाले.
राग दुर्गा तील सखी मोरी ने श्रोत्यांना झपतालावर ठेका धरायला लावला, त्यानंतर सूर निरागस हो ,काहे मान करो अशा सुप्रसिद्ध गाण्यांनी श्रोत्यांना मोहित केले या सत्रात बासरी विद्यार्थ्यांनी ही आपली कला सादर केली. पहिल्या सत्राची सांगता नारी शक्ती म्हणजेच अकादमीच्या लेडीज बॅच फ्युजन डान्सने झाली, यात पिंगा पिंगा, अप्सरा आली आणि उदे ग अंबे या गाण्यावर नृत्य सादर झाले, श्रोत्यांना या नृत्याने खिळवून टाकले.
कार्यक्रमाचे दुसरे सत्र संध्याकाळी साडेपाच वाजता सुरू झाले. या सत्रात राग भूपाली आणि राग यमन हे राग सुंदर रीतीने प्रस्तुत करण्यात आले, एक वेगळा उपक्रम म्हणजे या सत्रात तबला कव्हर्स सादर केले गेले सध्या ऑनलाईन वर ट्रेंडिंग असणाऱ्या अशा ट्रॅक तबला तबला कवर्स चे प्रात्यक्षिक या कार्यक्रमात सादर केले गेले. मै तेनु समजावा, मेरे ढोलना, मन मंदिरा या ट्रॅकवर गाणं आणि तबला सादर करून विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले. शेवटी पंडित बॅचने अप्रतिम तबला सादरीकरण करून लोकांची वाहवा मिळवून या कार्यक्रमाची सांगता केली.
या कार्यक्रमाला नाग शांती मोटर्स चे चेअरमन मिस्टर अँड मिसेस अगडी हे उपस्थित होते. कार्यक्रमात बेस्ट स्टुडंट पारितोषिक कुमार श्रीनिवास चाटे तबल्यात तर कुमारी भक्ती व कुमार भुवन पत्तार यांना गाण्यात श्री अगडी यांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाच्या दोन्ही सत्रात अकादमीच्या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले. अकादमीच्या फ्रांचायजीचे सर्टिफिकेट या कार्यक्रमात कुमार अमेय, कुमार सावन व कुमार शशांक यांना प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला, या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु.साची मोडक हिने केले. कार्यक्रमाला श्री दिलीप चिटणीस, श्री श्रीधर कुलकर्णी, सौ. अर्चना बेळगुंदी, सौ. मैथिली आपटे हे उपस्थित राहिले. या कार्यक्रमात सरस्वती वाचनालयाला इमारत निधी म्हणून तरंग अकादमीच्यावतीने श्री पीजी कुलकर्णी आणि सविया पारनट्टी यांच्याकडे देणगी सुपूर्द करण्यात आली. संचालिका व संचालक सौ समीरा व श्री विशाल मोडक यांनी या कार्यक्रमाचे अत्यंत नियोजनबद्ध सादरीकरण केले.