उरी या सर्जिकल स्ट्राईक वर आधारित चित्रपटाचा अनुभव येथील गजाननराव भातकांडे स्कुलच्या विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे घेतला. जाज्वल्य देशभक्ती आणि देशप्रेम यांचा अनुभव विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी स्वरूप नर्तकी चित्रपटगृहात खास सर्व विद्यार्थ्यांसाठी या एकत्रित शो चे आयोजन करण्यात आले होते.
भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी हा चित्रपट पाहिला.
विद्यार्थ्यांसोबत शाळेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे, मुख्याध्यापिका दया शहापुरकर,शिक्षिका सुवर्णा खंनुकर, जॉन पिंटो, मारिया रोझारियो, भारती बेळगुंदी, उषा नेगनाळकर, मॅथ्यू लोबो, स्नेहल परमेकर, पूजा हेबाळकर, पल्लवी पावले, मधू रायकर, मिनी नायर, मोहन रजपूत, अश्विनी खराडे हे सुद्धा उपस्थित होते.
स्वरूप नर्तकीचे मालक अविनाश पोतदार यांनी उत्कृष्ट नियोजन करून व्यवस्था केली होती.