कित्तूर चन्नामा सर्कल येथील सरकारी पॉलिटेक्निक च्या सर्वात वरच्या मजल्यावरून एक विद्यार्थ्याने उडी घेऊन आत्महत्या केली आहे. सकाळी साडे दहा वाजता उडी घेऊन तो गंभीर जखमी झाला होता त्याला उपचारा साठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र त्याचा काहीही उपयोग न होता त्याचे निधन झाले.
शिवप्रसाद पवार वय 18 रा. गजबरवाडी, निपाणी असे त्याचे नाव आहे. डिप्लोमा सिव्हिल शाखेत तो चवथ्या सेमिस्टर मध्ये शिकत होता.
सकाळी 10 वाजता तो नेहमी प्रमाणे कॉलेजला आला पण त्याने लागलीच हे कृत्य केले आहे. त्याला इतर कुठला त्रास होत की कौटुंबिक त्रास होता की आणखी कोणते कारण आहे हे समजू शकलेले नसून पुढील तपास सुरू आहे.