विमान उड्डाणाच्या क्षेत्रांमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या आणि हुबळी तिरुपती, हुबळी बेंगलोर व बेळगाव बेंगलोर अशा तीन विमानसेवा सुरू केलेल्या स्टार एअर या कंपनीने आपल्या विमानांच्या देखभालीसाठी रोल्स-रॉइस या नामवंत कंपनीशी करार केला आहे.
या करारांतर्गत प्रत्येक विमानाची देखभाल केली जाणार असून कंपनीच्या तज्ञ व्यक्ती या विमानांची देखभाल करणार आहेत.
प्रवासात ग्राहकांना कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये यासाठी स्टार चे चेअरमन संजय घोडावत यांनी विमानाची व्यवस्था योग्य राहण्याकडे लक्ष द्या अशी सूचना केली होती.
विमान प्रवाशांना कोणतीही कमी पडू नये याची काळजी घेण्याची सूचना केली होती. यावरून कंपनीचे सीईओ तीवाना यांनी रोल्स-रॉइस कंपनीशी करार केला असून ही मानाची गोष्ट ठरली आहे.