एकाद्या नेत्याबद्दल कार्यकर्त्यांत प्रेम असले की ते त्या नेत्यांसाठी काय वाट्टेल ते करण्यास तयार होत असतात. बेळगावचे पालक मंत्री व वन मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या कार्यकर्त्यांनी एक असेच अभियान सुरू केले आहे. हे अभियान ऑनलाईन असून सतीश जारकीहोळी मुख्यमंत्री अभियान असे त्याचे नाव आहे.
सतीश जारकीहोळी यांनी आपण आता राजकीय जीवनात एक महत्वाचा टप्पा पार केला असून पुढील दहा वर्षांत कर्नाटक राज्याचा मुख्यमंत्री होणे हे आपले ध्येय असल्याचे जाहीर केले होते. हे जाहीर केल्यानंतर कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
याबद्दल स्वतः सतीश जारकीहोळी यांनीही आपले यास समर्थन असल्याचे म्हटले आहे. कार्यकर्त्यांना जे वाटते तेच आपण स्वतालाही वाटते तेंव्हा त्यांची भावना बरोबर आहे असे जारकीहोळी यांनी सांगितले आहे.