Wednesday, November 20, 2024

/

‘संतीबस्तवाड खून प्रकरणातील आरोपींना फाशी द्या’

 belgaum

गेल्या आठवड्यात संतीबस्तवाड येथील निर्घृण खून केलेल्या युवकाच्या आरोपीना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी संतीबस्तवाड ग्रामस्थ आणि पालकांनी केली आहे.मंगळवारी पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांना निवेदन देत त्यांनी ही मागणी केली आहे.

गेल्या 27 जानेवारी रात्री त्याच गावातील युवकांनी विश्वनाथ बिरुमती (23)याचा शीर धडा वेगळे करत निर्घृण हत्या केली होती.या प्रकरणी प्रशांत निडलगेकर,दुर्गेश मिडकनट्टी,बाबुराव बागेवाडी,रवी जड्डेमनी,गुरू कोलकार,राजू जड्डेमनी,सुरेश गुदली सर्वजण रा.संतीबस्तवाड यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.सर्व सात आरोपीना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी मयतांचे पालक आणि ग्रामस्थांनी पोलीस आयुक्तांना निवेदन देत केली.

Santi bastwad
विश्वनाथ हा 27 रोजी रात्री मित्रा सोबत पार्टीला गेला होता रात्री साडे अकरा वाजता वादावादीत हा खून झाला होता त्याच्या शरीरावर तीक्ष्ण हत्त्याराने वार करून शीर धडा वेगळे केले होते. संतीबस्तवाड ग्रामस्थांनी पोलीस आयुक्तांना मागणी करत आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.