बेळगाव महानगरपालिका प्रभाग पूनर्रचना आणि आरक्षण विरोधातील कर्नाटक उच्च न्यायालय धारवाड खंडपीठातील याचिकेवरील सुनावणी पुन्हा दोन आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आली आहे.
मंगळवारी झालेल्या सुनावणीत महा पालिकेच्या वतीने हरकत दाखल करण्यात आली आहे.2011 च्या जनगणनेच्या आधारावर प्रभाग पुनर्रचना आणि आरक्षण जाहीर केलं असून आम्ही योग्यरित्या हे जाहीर केल्याचं त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.यावर कोर्टाने दोन आठवड्यानंतर सुनावणी घेऊ असं म्हटलं असल्याची माहिती याचिकाकर्ते वकील धनराज गवळी यांनी दिली.
मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागू होण्याची शक्यता आहे, त्यामुळे महापालिकेची निवडणूक लोकसभे नंतरच हे जवळपास निश्चित झाले आहे.
मार्च दहा नंतर ही सुनावणी होणार असून आरक्षण आणि पुनर्रचना बदल होईल की जाहीर झाल्याप्रमाणेच होईल हे आता या याचिकेवरील निकाला नंतर स्पष्ट होणार आहे.