येळ्ळूर हे गाव सीमा लढ्याचे केंद्र बिंदू आहे ‘जे येळ्ळूर मध्ये पिकतं तेच बेळगावात उगवतं’असं म्हटलं जातं.पुलवामा अतिरेकी हल्ल्या नंतर सध्या देशात सर्वत्र पाकिस्तानचा वेगवेगळ्या पद्धतीने सर्व थरातून निषेध होत असताना बेळगावचे लढाऊ गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या येळ्ळूर गावाने देखील आगळ्या वेगळ्या पद्धतीने पाकिस्तानचा निषेध केला आहे.
बेळगावातील शिवाजी नगर कामत गल्ली आदी भागात पाकिस्तानचा ध्वज जाळला होता तर सर्वच निषेध मोर्चातून पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा देत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली जात होती.अश्याच आगळ्या वेगळ्या पद्धतीनं निषेध येळ्ळूर शिवसेना आणि विराट युवक मंडळ यांनी गावच्या वेशी वरील भर रस्त्यात पाकिस्तानचा ध्वज काढून निषेध व्यक्त केला आहे.
मंगळवारी सायंकाळी गावभर निषेध रॅली काढण्यात आली त्यानंतर गावच्या रस्त्यावर पाकिस्तानी राष्ट्रध्वज नकाशाची प्रतिमा रेखाटली. या गावात ये जा करणारा प्रत्येक माणूस प्रत्येक वाहन हा रस्त्यावर रेखाटलेला पाकचा ध्वज पायात तुडवून ये जा करणार आहेत.या मुळे पाकचा अपमान होईल आमच्या मनातील राग चीड कमी होणार नाही असे मत नकाशा रेखाटणाऱ्या युवकांनी व्यक्त केलीत.
यावेळी येळ्ळूर ग्राम पंचायत सदस्य सतिश कुगजी, नितीन मजुकर, दिपक खादरवाडकर, सुशांत जाधव,प्रमोद मजुकर, सौरभ जाधव, आकाश नायकोजी, प्रशांत टक्केकर, अजित मजुकर, बबलू पोतदार, सौरभ कुगजी, सागर नायकोजी व ईतर शिवसेना कार्यकर्ते व देशप्रेमी उपस्थित होते
जम्मू काश्मीरमधील सततच्या होणाऱ्या अतिरेकी हल्ल्यात पाकचा हात आहे हे अनेकदा सिद्ध झाले आहे पुलवामा घटने नंतर अतिरेकी संघटना ‘जैश ए मोहम्मद’या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती जैशची पाळेमुळे पाक मध्येच आहेत त्यामुळेच देशात पाकिस्तान विषयी संताप व्यक्त होत आहे.
बेळगाव तालुक्यात येळ्ळूर याच गावात मिलिटरी मध्ये भर्ती झालेल्यांची आणि शिक्षकांची संख्या सर्वाधिक आहे त्यामुळे इथेच देशप्रेम देखील अधिक पहायला मिळतं. रस्त्यावर पाकिस्तानी ध्वज कोरून या गावच्या युवकांनी ते अधिक देश प्रेम सिद्ध देखील करून दाखवलंय.