ट्विटर या सामाजिक माध्यमावर ट्विट करून स्टार एयर च्या विमानाचे सर्व श्रेय उडान तीन ला देण्याचा प्रयत्न खासदार सुरेश अंगडी यांना महागात पडला, आता त्यांनी माफी मागितली असून गैरसमजातून आपण असे ट्विट केल्याचे म्हटले आहे.
उडान च्या तिसऱ्या फेजमध्ये बेळगावचा समावेश झाला असला तरी अद्याप एकही विमान सुरू झालेली नाही मात्र स्टार एअर कंपनीने सुरू केलेल्या बंगळूर विमानाचे श्रेय घेण्यासाठी खासदार अंगडी यांनी ट्विट केले होते .
या ट्विटमुळे सगळीकडे टीका झाली आणि आता अंगडी यांनी घुमजाव केले असून स्टार एअरचे ते विमान उडान मधील नाही हे स्पष्ट केले आहे. राजकीय व्यक्तींनी कोणतेही पोस्ट करताना खातरजमा करून घेण्याची गरज आहे .मात्र तसे होत असल्यामुळे जनतेमध्ये गैरसमज निर्माण होत असून यापुढील काळात काळजी घेण्याची गरज आहे.
खालील पैकी एवढे मार्ग उडान योजनेतील आहेत
बेळगाव ते सुरत
बेळगाव ते आग्रा
बेळगाव ते तन्जोर
बेळगाव ते जयपूर
बेळगाव ते जोधपूर
बेळगाव ते तिरुपती
बेळगाव ते अहमदाबाद
बेळगाव ते पुणे
बेळगाव ते ओझर ( नाशिक)
बेळगाव ते नागपूर
बेळगाव ते हैद्राबाद
बेळगाव ते काडाप्पा
बेळगाव ते मैसूर
बेळगाव ते इंदूर
बेळगाव ते गुलबर्गा
हे मार्ग समाविष्ट आहेत.