कोर्ट आवारात बसवण्यात आलेल्या सार्वजनिक वॉटर किऑस्क चा दुरुपयोग केला जात आहे, हा दुरुपयोग थांबवा अशी मागणी वकील हर्षवर्धन पाटील यांनी स्मार्ट सिटी लिमिटेड कडे केली आहे. आज त्यांनी आपले एक निवेदन देऊन ही मागणी केली आहे.
के ए 22 बी 8698 या रिक्षाचा वापर करून या किऑस्क मधून पाणी घेऊन जाऊन शुद्ध पाणी आपण तयार केल्याच्या नावाखाली विकले जात आहे.
पाण्याच्या रिकाम्या कॅन व बाटल्या आणून भरून घेऊन जात आहेत व या पाण्याची विक्री केली जात आहे.
या रिक्षाचा वापर एक पाणी विकणाऱ्या कंपनी कडून केला जात असून स्मार्ट सिटी मधून मिळणारे पाणी चुकीच्या आणि बेकायदेशीर पद्धतीने विकले जात आहे.या प्रकरणाची योग्य चौकशी करून कारवाई करा अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.