असंतुष्ट म्हणून पक्षाच्या सर्वच प्रकारच्या कामकाजात गैरहजर राहणाऱ्या व असूंतुष्ट आमदारांवर विधानसभा अधिवेशनात उपस्थित राहण्या संदर्भात काँग्रेसने व्हीप जारी केली होती. तरीही या आमदारांनी अनुपस्थिती दर्शवली यामुळे काँग्रेस पक्षाने आणखी एकदा व्हीप जारी केली आहे.
याला प्रतिसाद न दिल्यास संबंधित आमदारांवर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी ,चिंचोळीचे आमदार उमेश जाधव , अथणीचे आमदार महेश कुमटळी, चिक्कबळापुर चे आमदार डॉ सुधाकर , हरिहर चे आमदार एस रामप्पा , जयनगरच्या आमदार सौम्या रेड्डी, हिरेकेरूर चे आमदार बी सी पाटील, बल्लारि चे आमदार बी नागेंद्र आणि कंपलीचे आमदार जे एन गणेश हे गैरहजर राहिलेले काँग्रेसचे आमदार आहेत.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काल हजर राहण्यासाठी व्हीप जारी करण्यात आली होती. मात्र ते अनुपस्थित राहिले पुन्हा एकदा व्हीप जारी करण्यात आली असून कारवाई होणार अशी माहिती मिळाली आहे.