जिल्हाधिकारी कार्यालया समोर फडकत असलेल्या राष्ट्रध्वजा समोर लाल पिवळा ध्वज फडकावू नये ‘तो राष्ट्र ध्वजाचा अपमान होतो’ यासाठी आंदोलन करणाऱ्या पाच मराठी भाषकांना कोर्टाने नोटीस बजावली आहे.
2017 मध्ये धर्मवीर संभाजी चौकात पाच मराठी भाषिक कार्यकर्त्यांनी काळी पट्टी बांधून कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त केला होता.बेळगावातील पाचव्या दिवाणी न्यायालयाने पाच समितीच्या कार्यकर्त्यांना नोटीशी बजावल्या आहेत
या नंतर सात जणां विरोधात कॅम्प पोलिसांत 153 अ दोन भाषिकात तेढ निर्माण करणे याखाली गुन्हा नोंद झाला होता.सूरज कणबरकर,द्वारकानाथ उरणकर,अजित कोकणे,नारायण किटवाडकर,सतीश गावडोजी,सुधीर कालकुंद्रीकर,मनोज पावशे यांना नोटीशी बजवल्या आहेत.
या सर्व जणांवर प्रक्षोभक भाषण करण्याचा गुन्हा देखील कॅम्प पोलिसात नोंद झालाय त्या नोटिशीला उत्तर देऊन मराठी भाषकांची बाजू मांडू या शिवाय राष्ट्रध्वज नीती संहिता नियमानुसार तिरंग्या समोर कोणताच ध्वज फडकला जाऊ नये असा नियम आहे मात्र या विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाय याला उत्तर देऊ अशी माहिती समितीचे वकील महेश बिरजे यांनी दिली.