पीक विमा रक्कमेची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शन करणारे शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांच्या गाडीला घेराव केला.शुक्रवारी सकाळी शेतकऱ्यांनी पीक विमा योजने रक्कम द्यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन केले होते.
पीक विमा योजना जारी झाल्यापासून कित्येक वर्षा पासून केवळ आश्वासने मिळत आहेत कुणीही शेतकऱ्यांचे दुःख पहायला तयार नाही बँकांचे अधिकारी आणि मायक्रो फायनान्स वाले मग्रुरी वाढली आहे यात लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
संतप्त शेतकऱ्यांनी डी सी यांच्या गाडीला घेराव घालताच जागे झालेले जिल्हाधिकारी बोमनहळळी यांनी आंदोलन स्थळी भेट देत लवकरात लवकर पीक विमा रक्कम कशी जमा होईल यावर काम करू असे आश्वासन दिले.शेवटी शेतकऱ्यांनी आंदोलनाची धार कमी करत जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनास जाऊ दिले.