थकीत ऊस बिल न मिळाल्याने एका शेतकऱ्याने डी सी ऑफिस समोर कीटकनाशक हातात घेऊन आंदोलन केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे.मेहबूब मुल्लाअसे त्या शेतकऱ्याचे नाव असून त्याने सौभाग्य लक्ष्मी साखर कारखान्याला ऊस पुरवला होता त्याचे थकीत बिल न मिळाल्याने संतप्त होऊन त्याने जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करत सर्वांचे लक्ष वेधले होते.
मेहबूब याने सकाळी जिल्हाधिकारी एस बी बोमनहळळी यांना निवेदन देत थकीत ऊस बिल देण्याची मागणी केली त्यावेळी हातात त्याने किटनाशक घेऊन हे आंदोलन केले गेल्या चार वर्षांनपासून अडीच लाख रुपये ऊस बिल सौभाग्य लक्ष्मी साखर कारखान्या कडून मिळणे बाकी आहे त्यामुळे आर्थिक संकटात सापडलो असल्याचे त्याने निवेदनात म्हटले आहे.
किटनाशक हातात घेऊन आंदोलन करतेवेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं यावेळी अनेक शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.साखर कारखान्यांची थकीत बाकीचा विषय गेली कित्येक महिने प्रलंबित आहे त्यामुळे हा प्रश्न कधी सुटणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.