मुचंडी येथील शेतकरी पुन्हा एकदा रिंगरोड वरून आक्रमक झाले असून त्यांनी रिंगरोडला विरोध केला आहे.
आमची जमीन जर घ्यायची असेल तर पहिला आम्हा शेतक-यांना विष पाजा मग आमची जमीन घ्या असा इशारा मुचंडी येथील शेतकरी बांधवांनी दिला. मुचंडी येथे सर्वे साठी येणा-या प्रत्येक अधिका-यावर मुचंडी स्टाईलने दणका दिला जाईल. असा इशारासुद्धा गावातील युवावर्गाच्या वतीने देण्यात आला.यापुढे घडलेल्या घटनेस प्रशासन जबाबदार राहिल अशी संतप्त शेतक-यांची प्रतिक्रिया आहे.
रिंगरोड मध्ये मुचंडी गाव परिसरातील शेत जमीन जाणार आहे. यामुळे शेतकरी संतापले आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपली जमीन देणार नाही असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.
मुचंडी गावच्या शेतकऱ्यांचे हे आक्रमक रूप पाहून सर्व्हे करणारे अधिकारी व कर्मचारी गायब झाले आहेत.रिंगरोड ला होत असलेल्या विरोधात कायम वाढ होत असून यामुळे प्रशासन अडचणीत सापडले आहे.
सुरुवाती पासूनच रिंग रोड जमीन संपादन करण्यास विरोध होत असून जसं जसे संपादन प्रक्रिया वाढेल तसं तसा जनतेचा विरोध वाढतच आहे. काल येळ्ळूर मध्ये शेतकऱ्यांची बैठक झाली होती दोन दिवसा पूर्वी मुचंडी तर आठवडा पूर्वी काकती येथे माती परीक्षण करण्यास देखील विरोध झाला होता.