गटारीत मानवी कवट्या सापडल्याने एकच खळबळ माजली आहे.बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरात बुधवारी सकाळी सदर घटना समोर आली आहे.
अथणी शहरातील विक्रमपूर नगरात राम कुलकर्णी यांच्या घरासमोरील गटारीत दोन मानवी कवट्या सापडल्या आहेत.अथणी नगरपालिकेचे स्वच्छता कामगार बुधवारी सकाळी गटार स्वच्छ करत असतेवेळी कचऱ्या सोबत दोन मानवी कवट्या आढळल्याने एकच खळबळ माजली आहे जनतेत काही काळ भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले होते.
सफाई कामगारांनी सदर घटनेची कल्पना पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली.गेल्या दोन दिवसा पूर्वी झालेल्या अमावस्ये निमित्त करणी केली असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून पोलिसांनी या कवट्या कुणाच्या आहेत याबद्दल तपास सुरू केला आहे.