रशियाची कन्या असलेल्या आणि बेळगावची सून बनून बेळगावकर झालेल्या महिलेने जयपूर येथे झालेल्या इंडियन फॅशन फियेस्टा स्पर्धेत मिसेस इंडिया हा किताब मिळवला आहे.
केरीना राजू चंद्रशेखरप्पा असे तिचे नाव आहे.जकार्ता येथे होणाऱ्या मिसेस इंटरनॅशनल स्पर्धेसाठी आता निवड झाली असून त्या आंतराष्ट्रीय सौन्दर्य स्पर्धेची तयारी सुरू करण्यात आली आहे.
मलेशिया येथे यशस्वी शो झाल्यानंतर जयपूर येथे या फियेस्टाचे आयोजन केले होते. हैवा हवन रिसॉर्ट मध्ये पाच दिवस स्पर्धा घेण्यात आल्या. 2 फेब्रुवारीला ग्रँड फिनाले झाला.
केरीना या मूळच्या रशियाच्या आहेत. हनुमान नगर बेळगावचे रहिवासी राजू यांच्याशी 2014 मध्ये वयाच्या 20 व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. 2013 मध्ये त्या भारतात आल्या होत्या.