बेळगावला आलेले अधिकारी बेळगावच्या इतके प्रेमात पडतात की त्यांना इथून जाववत नाही. बेळगाव येथील पोलीस आयुक्त डॉ. डी सी राजप्पा यांच्या बदलीचा आदेश 24 जानेवारी रोजी देण्यात आला आहे. मात्र अजूनही नूतन पोलीस आयुक्त यांनी वर्णी लागली नसल्याने ते गेलेले नाहीत. प्रयत्न करून त्यांनी आपले जाणे लांबवल्याची चर्चा आहे.
राजप्पा यांच्या बदली बद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. आता नूतन पोलीस आयुक्त कधी रुजू होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. बदली झाली पण जागा खाली करण्याचा आदेश येणे थांबल्याने त्यात वरून वशिला लावला गेला अशी चर्चा असून राजप्पा यांचे बेळगाव वरील आणि इथल्या पोलीस स्थानकांवरील जास्त झालेले प्रेम चर्चेत आहे.
पोलीस आयुक्त डॉ डी सी राजप्पा यांची बदली झाली असली तरी नूतन पोलीस आयुक्त यांना अजून मुवमेंट ऑर्डर देण्यात आली नसल्याने ही बदली थांबल्याची माहिती मिळाली आहे.
बेळगाव शहरात सध्या मटका, जुगार आदी अवैध धंदे फोफावले आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. हे रोखण्यासाठी एखाद्या कर्तव्य दक्ष अधिकारी बेळगावला येणे आवश्यक आहे. त्यामुळे यावेळी तरी चांगले अधिकारी आल्यास बेळगावातील अवैध धंदे बंद पडतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
मागील काही वर्षांपासून बेकायदेशीर वाळू वाहतूक सुरू असतानाही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. ही बाब वरीष्ठ अधिकाऱ्यांचा मार्गदर्शनाखाली होत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे हे सारे बेकायदेशीर धंदे बंद पडण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी बेळगावला आता कर्तव्य दक्ष अधिकारी हवा असल्याचे बोलले जात आहे.