हनुमान नगर सर्कल जवळ सह्याद्री नगर बसला अडवून कंडक्टर ला मारहाण करून मारहाण करण्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी सकाळी एका प्रवाश्याने सी बी टी जवळ बस कंडक्टर मारहाण केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सी बी टी बस मधून प्रवास करणाऱ्या मद्यपीने क्षुल्लक कारणावरून बस वाहकाशी हुज्जत घालत बस बाहेर मारहाण केली आहे.त्या मारहाण करणाऱ्या प्रवाश्याचा बस वाहका बरोबर वाद घालतेवेळीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.पोलीस निरीक्षकांना संपर्क साधला असता सायंकाळी पाच पर्यंत तरी सदर घटनेची नोंद मार्केट पोलिसात झाली नव्हती.
विजयनगरच्या तीन युवकांनी केली होती बस कंडक्टर ला मारहाण
गेल्या 14 फेब्रुवारी रोजी सी बी टी सहयाद्री नगर बसला हनुमान नगर सर्कल जवळ अडवून या तिघा युवकांनी बस चालक सचिन खांडे यांना मारहाण केली होती याबाबत बस वाहक शंकर लमानी यांनी फिर्याद दाखल केली होती
महादेव चौगुले वय18 विजयनगर बेळगाव,ओमकार नगराचा हिरामणी भात कांडे वय 18 तर बसव कॉलनी चा मारुती।पाटील वय 18 यांना अटक झाली होती गेल्या बुधवारी रात्री तिघे युवक दुचाकी वरून चुकीच्या दिशेने गाडी चालवत बसकडे आले अन बस चालकाला मारहाण केली होती.ए पी एम सी पोलिसात गुन्हा नोंद झाला होता.