आज बेळगाव live शूर वीर तरुण निखिल जितुरी याचा सत्कार करणार आहे. कसे दाखवले निखिल याने आपले शूर वीर पण आणि का होतोय त्याचा सत्कार?
वडगावच्या निखिल जितुरी या धाडसी तरुणाला केंद्र सरकारने बालशक्ती पुरस्कार देऊन सत्कार करण्यासाठी निवडले . राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते त्याला हा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला आहे.
विहिरीत पडलेल्या एक बालकाला त्याने आपला जीव धोक्यात घालून वाचवले होते.याबद्दल त्याची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. १ लाख रुपये रोख, प्रमाणपत्र आणि पदक देऊन त्याचा सन्मान करण्यात आला आहे.
१३ एप्रिल २०१८ रोजी एक बालक विहिरीत पडले होते. त्याला निखिल याने वाचवले होते.या अगोदर निखिलला ला होयसळू आणि केळदी चन्नामा हे राज्य स्तरीय बाल पुरस्कार मिळाले आहेत. आता त्याच्या शौ र्याची प्रशंसा खुद्द राष्ट्रपतीनी केली आहे. त्यामुळे बेळगाव साठी ही एक अभिमानास्पद बाब आहे.
निखिल हा संपूर्ण बेळगावसाठी अभिमान ठरला असून त्याचा सत्कार करताना आम्हाला अभिमान वाटतो सर्वात महत्वाची बाब म्हणजे ब्रावो निखिलची बहादूरी ची गाथा सर्व प्रथम बेळगाव live नेच जगा समोर मांडली होती.