Thursday, January 2, 2025

/

खानापूर चा नितीन पाटील मिस्टर बेळगाव किताबाचा मानकरी

 belgaum

बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या वतीने मंगळवार दिनांक 19 रोजी संभाजी उद्यान येथे घेण्यात आलेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेतील विविध गटातील विजेते विशाल पाटील गिरीश कारेकर, शाहरुख बेपारी, संकेत सुरुटेकर व सुधीर मनोळकर यांच्यात चुरशीची लढत होऊन खानापूरच्या नितीन पाटील यांने मानाचा मिस्टर बेळगाव 2029 हा मानाचा किताब पटकावला तर पॉवर फिटनेस जिमचा गिरीश कारेकर याने बेस्ट पोझरचा मान मिळवला.

Body bilding

उद्योजक विठ्ठल गवस ,संजय कडोलकर ,भाऊराव गडकरी, मंजुनाथ भुते ,अमर सरदेसाई ,रोहन जाधव ,दीपक लोकरी, सागर पुरोहित अश्विन पाटील, रमेश कंगन्नावर यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

राष्ट्रीय पंच महेश मोरे, प्रेश शिंदे ,राज्य पंच नितीन जाधव यांनी पंचाचे काम पाहिले आहे. आर्य एकबोटे, विलास भातकांडे, संतोष बाबली, गजानन मैत्री यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.