Friday, December 20, 2024

/

बेळगावची साजणी टीव्ही चॅनेलवर

 belgaum

बेळगावच्या संगीत कलाकारांनी एकत्र येऊन तयार केलेल्या तू अशी साजणी या गाण्याने सध्या धमाल केली आहे. युट्युब चॅनेल वर झळकलेले हे गाणे आत्ता वेगवेगळ्या म्युजिक चॅनलवर सुद्धा पसरत चालले आहे.
यापूर्वी याच ग्रुपने बनवलेली स्वप्नात माझ्या होते, हे गजानना व इतर गाणी गाजली आहेत. आज या ग्रुपमध्ये स्थानिक 60 ते 65 कलाकार आहेत. तू अशी साजणी हे गाणेही याचाच एक भाग आहे.

Belgaum song
गौडवाड येथील दिनेश बेकवाडकर आणि काकती येथील अश्विनी कोचेरी या तरुणांना घेऊन हे गीत बनवण्यात आले आहे. एव्हरेस्ट इंटरटेन्मेंट या कंपनीने हे गाणे रेकॉर्ड केले असून या ग्रुपचा प्रमुख असलेल्या अनुप पवार यांचे परिश्रम व इतरांची साथ मोठी आहे.
बेळगावचे कलाकारही काही कमी नाहीत मनात आणले की ते सत्यात उतरवून दाखवतात हेच त्यांनी दाखवून दिले आहे.
संगीत मराठी या चॅनेल वर हे गाणे गाजत असून ते पाहून प्रत्येक बेळगावकराने बेळगावच्या या साजणी चे कौतुक करायलाच पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.