यावर्षी कर्नाटक विधानसभेच्या बेळगाव येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनाचा खर्च किती झाला असेल? हा खर्च आहे फक्त 11.24 कोटी. 10 ते 21 डिसेंबर याकाळात हे अधिवेशन झाले होते. यापूर्वी झालेल्या खर्चाच्या मानाने यंदाचा खर्च फारच कमी झाला आहे.
यावर्षीही सर्व खर्च जिल्हा प्रशासन ने केला असून 15.42 कोटीचे बजेट बनवण्यात आले होते. त्यापैकी 5 कोटी सरकारने आधीच दिले होते. आता जिल्हाधिकारी एस बी बोमणहळ्ळी यांनी उर्वरित 6.24 कोटी रुपये पाठवण्याची सूचना केली आहे.
2016 मध्ये 20.55 तर 2017 मध्ये 29.39 कोटी खर्च झाला होता. त्या तुलनेत हा खर्च फारच कमी असल्याचे दिसत आहे.