एकीकडे काँग्रेस आणि जेडीएस हे पक्ष जागावाटपावरून चर्चा करत असताना भारतीय जनता पार्टीने मात्र लोकसभेची तयारी सुरू केली असून ही सुरुवात बेळगाव मधून केली आहे.
यासाठी आज बेळगावात कार्यकर्त्यांची बैठक झाली. महात्मा गांधी भवन येते शक्ती केंद्रप्रमुख संमेलन या नावाखाली झालेल्या बैठकीत बेळगाव येथील जागा राखून ठेवणे बरोबरच चिकोडी येथील जागा जिंकण्याचा निर्णय घेण्यात आला.
विधानपरिषद सदस्य महंतेश कवटगीमठ यांनी यावेळी भाषण करताना स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या जागा जास्त संख्येने निवडून देऊन पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान करायचे आहे असे सांगितले. बेळगाव व चिकोडी मध्ये भाजपने आपले खासदार निवडून आणणे हे अतिशय महत्त्वाची गरज आहे
.मागच्या वेळी चिकोडी मध्ये काँग्रेसचे प्रकाश हुक्केरी जास्तीत जास्त मतांनी निवडून आले असले तरी यावेळी त्यांचा पाडाव करून त्या ठिकाणी ही भाजपची जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करूया असे त्यांनी सांगितले.