कॉलेजरोडवरील कार्पोरेशन बँकेच्या एटीएम मधून फाटक्या चुरगळलेल्या आणि शाईने माखलेल्या नोटा बाहेर पडल्यात. या नोटा काढणाऱ्या ग्राहकांना त्यामुळे धक्काच बसला असून नोटांचे करायचे काय असा प्रश्न निर्माण झालाय.
बेळगाव येथील डॉ स्मिता प्रभू यांनी कार्पोरेशन बँकेच्या एटीएम मधून अशा नोटा काढला असता पाचशे रुपयांच्या नोटा चुरगळलेल्या फाटलेल्या शाईने माखलेले होते .यावेळी एटीएम च्या बाजूच्या दुकानदाराला विचारले असता अशा घटना घडत असून एक दोन दिवसापूर्वी दोन हजार रुपये काढण्यास आलेल्या ग्राहकास याच प्रकारच्या नोटा काही ग्राहकांना मिळाल्या आहेत अशी माहिती त्यांना मिळाली.
यासंदर्भात कार्पोरेशन बँकेकडे तक्रार होण्याची शक्यता आहे. कार्पोरेशन बँकेने आपल्या एटीएम मध्ये चुकीच्या आणि बिन उपयोगाच्या नोटा घालू नयेत अशी मागणी आता ग्राहक करणार आहेत.