बेळगाव येथील प्रसिद्ध वकील के बी हन्नूरकर (मूळचे बसुरते )वय 65 रा. केळकर बाग बेळगाव यांचे निधन झाले आहे बुधवारी दुपारी एक वाजता के एल इ इस्पितळात शेवटचा श्वास घेतला त्यांच्या वर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होता.
मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे संचालक तर मराठा मंदिर कमिटीचे मार्गदर्शक होते. 2010 ते 2012 या काळात सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष आणि सदस्य म्हणून कार्य करत होते.
1974 साली कर्नाटक भू कूळ कायदा अमलात आल्यावर कुळ शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष कार्य केले होते अनेक गरीब शेतकऱ्यांना त्यांनी न्याय मिळवून दिला होता.
लहान पणा पासून त्यांना समाज सेवेची आवड होती वेळोवेळी अनेक वर्तमान पत्रातून त्यांनी कायदे विषयक लेख लिहून जनजागृती केली होती. बेळगाव तालुक्यातील अनेक शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांना ते मार्गदर्शन करत होते. वकिली व्यवसाय जनसेवा हा उद्देश समोर ठेऊन करणाऱ्या व्यक्ती पैकी ते मराठा समाजाचे नेते होते एक होते.बुधवारी सायंकाळी चार वाजता सदाशिवनगर बेळगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.