काही दिवसापासून दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्याठिकाणी पाणी पुरवठा करण्यासाठी धडपड सुरू झाली असली तरी ज्या ठिकाणी पाणी पुरवठा करण्यात येत आहे त्या ठिकाणी अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे.
ज्या टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे त्या टँकर च्या पाण्याची तपासणी करण्यासाठी कोणतीच यंत्रणा अस्तित्वात नाही. त्यामुळे दुष्काळी भागात सध्या आजारांच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येते. जिल्हा प्रशासनाने याकडे गंभीरपणे विचार करून त्यावर उपाय योजना राबविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
ज्या भागात असे प्रकार घडत आहेत त्या भागात बाटलीबंद पाणी पुरवठा करण्याची गरज आहे. नाही तर टँकरने पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरची योग्य तपासणी करण्याची गरज आहे. ज्या ठिकाणी अशा घटना घडत आहेत त्या ठिकाणी काहीनी बाटलीबंदचा व्यवसाय थाटल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे, असे वाटते.
सध्या जिल्ह्यातील 3 ते 4 तालुक्यातील गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे तर काही ठिकाणी चारा छावण्या घालण्यात आल्या आहेत. मात्र जेथे पाणी पुरवठा केला जातो ते तपासून नागरीकांना शुद्ध पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली जात आहे.