belgaum

संती बस्तवाड खून प्रकरणी सात जणांवर गुन्हा

0
1695
Birumati
 belgaum

संतीबस्तवाड येथील माजी तालुका सदस्याचा धारधार शस्त्राने हल्ला करून खून केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आल्याने या भागात खळबळ माजली आहे. विश्वनाथ यल्लप्पा बिरुमती वय 24 रा.संतीबस्तवाड बेळगावं असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

संतीबस्तवाड गावातील एका शाळेजवळ सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळला होता दरम्यान घटनास्थळी ग्रामीण पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.

Birumati

विश्वनाथ हा रविवारी रात्री मित्रा सोबत पार्टीला गेला होता रात्री साडे अकरा वाजता वादावादीत हा खून झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या शरीरावर इतका तीक्ष्ण हत्त्याराने वार केला होता की त्यात शीर धडा वेगळे झाले होते.या प्रकरणी सात जणांवर गुन्हा नोंद झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.