मच्छे आणि देसुर भागातील घरफोड्या करून दागिने रोख रक्कम लंपास करणाऱ्या येळ्ळूर येथील दोघां चोरट्यांना बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या जवळील लाखोंचा ऐवज लंपास केला आहे.
रुपेश उर्फ टायगर इरापा हलगेकर वय 19 रा. येळ्ळूर, बजरंग परशुराम कुटरे वय 19 रा. येळ्ळूर अशी या चोरट्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देसुर मच्छे या गावातील अनेक घरात चोऱ्या करत दागिने आणि रोख रक्कमेची चोरी केली होती.गेल्या 28 जानेवारी रोजी दोघांनाही ताब्यात घेतले असता त्यांनी तपासात चोऱ्या केल्याचे कबूल केले आहे.
दोन दुचाकी,210 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 200 ग्रॅम चांदीचे दागिने यांच्या सह एकूण 7 लाखांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केला आहे.ग्रामीण पोलीस निरीक्षक संगमेश यांच्या नेतृत्वात पोलिसांनी कारवाई केली असून ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
Wrong news… 15 tarikh ko Pakada ..tha.. Our unko marake jabaradasti Sab kabool karawaya hai… Joh inhone kabhi kiya hi nai….. Our.. Jisake pas khudake chappal pehenane ke paise nai woh kaise chori Kar sakata hai…. Joh 3000 Ka.mobile lene ke liye….. Overtime karata hai… Usake upar itana bada iljam…