सात जानेवारीला होणारी उडान ची घोषणा लांबणीवरच पडली असून ती केंव्हा होणार हे अजून स्पष्ट नाही. सरकार ला १११ निविदा अर्ज मिळाले असून त्यापैकी किती अर्जना मंजुरी मिळाली आहे हेच अजून जाहीर करण्यात आले नाही.
केंद्रीय महसूल खात्याकडून सबसिडीची तरतूद झाली नसल्याने उशीर होत असल्याचे कारण समजले आहे.हे खाते केंद्रीय अर्थसंकल्प तयार करण्यात गुंतलेले असल्याने हा उशीर होत असल्याचे समजते आहे.
या योजनेत विमानातील ५० टक्के जागा सवलतीच्या दरात मिळतात. या जागा रिकाम्या राहिल्या तर सरकार विमान कंपनीला काही रक्कम देते. ही रक्कम केंद्र सरकार ८० टक्के आणि राज्य सरकार २० टक्के भार उचलून देते.
सध्या १७ मार्गांसाठी अर्ज आले आहेत त्यात
बेळगाव ते सुरत
बेळगाव ते अजमेर(किशनगड)
बेळगाव ते वडोदरा
बेळगाव ते जोधपूर
बेळगाव ते जयपूर
बेळगाव ते तिरुपती
बेळगाव ते अहमदाबाद
बेळगाव ते हिंदन (दिल्ली)
बेळगाव ते मंगळूर
बेळगाव ते पुणे
बेळगाव ते ओझर ( नाशिक)
बेळगाव ते नागपूर
बेळगाव ते इंदूर
बेळगाव ते हैद्राबाद
बेळगाव ते कडाप्पा
बेळगाव ते मैसूर
बेळगाव ते कोचीन हे मार्ग समाविष्ट आहेत.