खानापूर आणि बेळगाव परिसरातील दुचाकी चोरणाऱ्या नऊ जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या जवळील लाख 61 हजार किंमतीच्या 13 दुचाकी जप्त केल्या आहेत.
किशन नाईक वय 23 भट गल्ली खानापूर,विवेक अवलक्की 20 दुर्गांनगर कॉलनी खानापूर,राहुल बुरुड वय 19 रेल्वे स्टेशन जवळ खानापूर,रामलिंग जेडी वय 20 स्टेशन रोड खानापूर,ओमकार कणबरकर 20 निंगापूर गल्ली खानापूर,अमित नाईक22 रा.संभाजीनगर वडगांव बेळगाव,ओमकार पाटील 19 देसाई गल्ली खानापूर,आशुतोष देसाई 21 निंगापुर गल्ली खानापूर,बनशी कुंभार वय 22 बुरुड गल्ली खानापूर अशी दुचाकी चोरट्यांची नावे आहेत.
खानापूर पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे माहितीत म्हंटले आहे की एक कारीजमा 23500 रु,चार यामाहा 80,000 रु. चार स्पेलेंडर 90,000 रु.एक टी व्ही एस स्कुटी 18000रु,दोन होंडा डियो 30,000 रु एक होंडा एकटीव्हा 20000 रु,अश्या सगळ्या मिळून 13 दुचाकी असून त्यांची किंमत अंदाजे 2 लाख 61 हजार पाचशे रुपये आहे.
बैलहोंगल डी एस पी करुणाकर शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक एम आर पवार पोलीस उपनिरीक्षक बी जे पाटील आदी सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.सदर अटक केलेल्या दुचाकी चोरात केवळ 20 ते 25 वयोगटातील तरुण आहेत.केवळ बेळगाव शहरच नव्हे तर खानापूर सारख्या लहान शहरात देखील अनेक युवक गांजाच्या व्यसनाधीन झाले आहेत गांजाच्या व्यसनातून त्यांनी दुचाकी चोरी केल्या असल्याची माहिती मिळाली.म